"दागिन्यांची आठवण झाल्यावर आजीला....", अजय-अतुलने सांगितला किस्सा
  • 2 years ago
इंडियन आयडल मराठी पहिल्या पर्वाला दणक्यात सुरुवात झाली आहे. या पर्वात संगीतकार अजय-अतुल हे परिक्षक आहेत. या कार्यक्रमाच्या ऑडिशनमध्ये एका स्पर्धकाने आपल्याला संगीत शिकता यावं यासाठी आजीने दागिने विकल्याचं सांगितल्यावर अजय-अतुल यांनाही त्यांच्या आजीची आठवण झाली. आमच्याही आजीने आमच्यासाठी दागिने विकले होते, असं त्यांनी त्या स्पर्धकाला सांगितलं. अजय-अतुलने त्यांच्या आजीचा हा किस्सा 'लोकसत्ता ऑनलाइन'शी बोलताना सांगितला आहे.
Recommended