सती प्रथा बंद करण्यासाठी यांनी केला होता प्रथम विरोध | Lokmat Marathi News
  • 3 years ago
ब्रिटिश सरकारद्वारा भारतातील सतीची जुलमी प्रथा बंद करण्‍यात आली होती. अखेर 4 डिसेंबर 1829 रोजी लॉर्ड विलियम बेंटिंक यांनी सती बंदीचा कायदा आणला होता. लॉर्ड विलियम बेंटिक यांनी भारतात अनेक सामाजिक सुधारणा केल्या. हिंदू धर्मियांच्या भावनांना हात घालण्यास ब्रिटिश सरकार देखील कचरत होते, पण राजा राममोहन रॉय यांचा निर्धार पक्का होता. त्यामुळे अनिष्‍ट प्रथा बंद करण्‍याचे श्रेय लॉर्ड बेंटिंक आणि राजा राममोहन रॉय यांना दिले जाते.हजारो वर्षे चालत आलेल्या या प्रथेला कोणीच विरोध केला नव्हता, असे म्हणता येणार नाही. शिवाजी महाराज यांनी स्वत: माँ जिजाऊंना सती जाण्यापासून रोखले होते. मल्हारराव होळकरांनी आपल्या सुनेला अर्थातच अहिल्यादेवी यांना सती जाण्यापासून रोखल्याचे उल्लेख प्राचिन ग्रंथांत सापडतात.


आमच्या चैनल ला सब्सक्राइब करा https://www.youtube.com/LokmatNews
Recommended