वाशिम - ग्रामस्थांचा रास्ता रोको

  • 3 years ago
शिरपूर (वाशिम) - पोलीस स्टेशन अंतर्गत येत असलेल्या कुकसा फाटयाजवळ ट्रक व मोटारसायकल यांच्यात अपघात झाला. यामध्ये मोटारसायकलस्वार सतिश वामन कुटे जागीच ठार झाल्याने गावातील नागरिकांनी ट्रक अडवून रास्ता रोको केला. ग्रामस्थांनी रास्ता रोको केल्याने एक किलोमीटरपर्यंत वाहनांच्या रांगा लागल्या होत्या.