#Shorts #DailyYoga आजचे आसन : अर्ध शलभासन | Sakal Media | SAAM TV | Dainik Gomantak |
  • 3 years ago
#Shorts
#DailyYoga

आजचे आसन : अर्ध शलभासन

शलभ म्‍हणजे locust (टोळ). अर्ध शलभासनाचे फायदे कोणते व हे आसन कसं करावं याविषयी सविस्तर माहिती घेणार आहोत.

अर्ध शलभासनाचे फायदे -

१. पाठदुखी व कंबरदुखीचा त्रास कमी होतो.
२. पार्श्वभाग आणि मांड्यांजवळील अतिरिक्त चरबी कमी होते.
३. पोटावरील चरबी कमी होण्यास मदत मिळते.
४. बद्धकोष्ठता, वातविकार, अपचन, जुलाब या समस्या दूर होतात.
५. पायांचे तळवे दुखणे, मुळव्याधीचा त्रास कमी होतो.

अर्ध शलभासन कसे करावे?

कृती:
१. जमिनीवर पालथे झोपा आणि हनुवटीचा स्पर्श जमिनीला करा.
२. हात शरीराच्या दोन्ही बाजूंना लागून शरीराला समांतर ठेवा.
३. दोन्ही हातांच्या मुठी बंद करा आणि हात मांडीच्या खाली ठेवा.
४. दीर्घश्वास घ्या आणि एक पाय जमिनीवर ठेऊन दुसरा पाय हळूहळ वर उचला.
५. शक्य होईल तितका पाय वर घ्या. मात्र, तो गुडघ्यात वाकणार नाही याची काळजी घ्या. तसंच हनुवटीही जमिनीलाच टेकलेली असावी.
६. त्यानंतर श्वास धिम्या गतीने सोडत पाय खालती आणा. असंच दुसऱ्या पायानी करा.

#sakal #yogaurja #devyanisyogaurja #yogasan #yoga #DailyYoga #saamtv #sakalmedia #reels #Dainikgomantak
Recommended