#Shorts #DailyYoga आजचे आसन : एकपाद उत्तानासन | Sakal Media | SAAM TV | Dainik Gomantak |
  • 3 years ago
#Shorts
#DailyYoga

आजचे आसन : एकपाद उत्तानासन

एकपाद उत्तानासनात पाठीवर झोपून केवळ पाय उचलले जाते. ओटीपोट आणि मांड्याच्या स्नायूंसाठी हे अतिशय उत्तम आसन आहे. पाद म्हणजे पाय आणि उत्तान म्हणजे आकाशाकडे तोंड करून झोपलेली अवस्था. हे आसन करताना पाठीवर झोपून एक पाय ६० ते ९० अंशांपर्यंत वर केला जातो. म्हणूनच या आसनाला एकपाद उत्तानासन असं म्हणतात.

एकपाद उत्तानासन कसे करावे?

चटईवर किंवा योग मॅटवर पाठीवर झोपावं. दोन्ही पाय सरळ आणि ताठ ठेवावेत. दोन्ही हात शरीरालगत ठेवावेत. आता उजवा पाय ६० अंश इतका वर आणावा. यावेळी पाय ताठ ठेवावेत. काही सेकंद थांबून पाय हळूहळू खाली आणावा. हे आसन करताना मान उचलू नये. हीच प्रक्रिया नंतर डाव्या पायाने करावी.

एकपाद उत्तानासनचे फायदे कोणते?

- मांड्या आणि ओटीपोटाचा खालचा भाग बळकट होण्यास मदत होते.
- ओटीपोटातील सर्व अवयवांचे कार्य सुधारते
- कमरेखालील सांधे मोकळे होतात.
- पाठीच्या कण्याचा खालचा भाग मजबूत होण्यास मदत मिळते.
- पचनक्रिया करणाऱ्या अवयवांचे कार्य सुधारते.


#sakal #yogaurja #devyanisyogaurja #yogasan #yoga #DailyYoga #saamtv #sakalmedia #reels #Dainikgomantak
Recommended