डिचोली-साखळी रस्त्यावरील गोकुळवाडा-सर्वण येथील धोकादायक वळणावर एक मोटारगाडी झाडीत कोसळली. हा अपघात एवढा भयानक होता की, उजव्याबाजूने रस्त्याच्या कठड्याचा एक खांब आणि झाड मोडून मोटारगाडी रस्त्याबाहेर सुमारे पंधरा मीटर अंतरावर कोसळली. या मोटारगाडीत असलेले चौघेजण मात्र किरकोळ जखमी झाल्याची माहिती मिळाली आहे. हा अपघात गुरुवारी (ता.27) रोजी रात्री उशिरा घडला.