चिमुकली दररोज उतरतेय पाण्यासाठी विहिरीत; बीडमधील पाणीटंचाई | Beed | Maharashtra | Sakal Media |
  • 3 years ago
जिल्ह्यातील बालाघाटाच्या पर्वत रांगेच्या कुशीत वसलेल्या धारूर तालुक्यातील वीजहीरा तांड्यांच्या ग्रामस्थांच्या पिण्याच्या पाण्याची टंचाई कांही केल्या थांबता थांबत नाही. कधीकाळी नैसर्गिक रित्या आकाशातून वीज कोसळून तयार झाल्या खड्यातील पाण्याच्या भरोशावर वसलेले वीजहिरा  हे तीस-चाळीस कुटुंबाचे दोनशे लोकसंख्येचे हे छोटंसं गाव. काळाच्या ओघात नैसर्गाच्या अवकृपेमुळे तहान भागविणाऱ्या झऱ्याचे विहिरीत रूपांतर झाले. साधारणतः पंचेवीस-तीस फुट खोलीच्या विहिरीतून पाणी काढणे थोरामोठ्यांना शक्य नाही. त्यामुळे खेळण्या-बागडण्याच्या वयात लहान गोंडस चिमुकल्यांना जीव मुठीत घेऊन विहिरीत उतरून वाटी-वाटी पाण्याने हंडा भरण्यासाठी जीवघेणी कसरत करावी लागत आहे. कोरोडो रूपये खर्चाच्या वीस खेडी पाणीपुरवठा योजनेच्या टाकीत पंधरा-वीस वर्षांपासून पाणीच आले नाही. मागील वर्षी ग्रामपंचायत कार्यालयाने घेतलेल्या बोअरचे वर्षभरातच पाणी आटले. पाण्याची तहान भागवण्यासाठी दिवसभर ग्रामस्थांची उन्हा-तान्हात भटकंती कांही केल्या थांबेना..! त्यामुळे या चिमुकल्यांवर 'पाणी टंचाईच्या झळा आमच्याचं का भाळी; धावेल काय मदतीला मायबाप सरकार संकट काळी..! अशी म्हणण्याची वेळ आली आहे. (व्हिडिओ स्टोरी : रामदास साबळे)
#sakalmedia #beed
Sakal Media Group is the largest independently owned Media Business in Maharashtra, India. Headquartered in Pune, Sakal operations span across newspapers, TV (SAAM TV), magazines, Internet, and Mobile. With a heritage of over 89 years Sakal Media Group Publishes the number 1 Marathi Newspaper in Maharashtra and also owns and operates its TV channel named SAAM TV.
Recommended