प्रवाशांच्या जीवाशी खेळ? नाशिक रोड रेल्वे स्टेशनला अजूनही तपासणी नाहीच | Sakal Media | Nashik
  • 3 years ago
नाशिक : शहरात कोरोनाचा महापूर आलेला असतानाच नाशिक रोड येथील रेल्वे स्टेशन येथे प्रवाशांची अजूनही तपासणी केली जात नाही. गेल्या दोन महिन्यापासून येथे कर्मचारी नसल्याने रोज आठ ते दहा हजार लोक रेल्वेने नाशिक शहरात प्रवेश करत आहे. यामुळे कोरोनाचा धोका वाढत आहे. राज्याबाहेरील काही ट्रेन नाशिक रोड रेल्वे स्थानकात थांबता हे या ट्रेनने अनेक प्रवासी नाशिक शहरात येऊन दाखल होत आहे. या लोकांची तापमान तपासणी सह इतर कुठल्याही प्रकारची तपासणी केली जात नाही. त्यामुळे नाशिक शहरात कोरोना चा धोका वाढत असल्याची प्रतिक्रिया वैद्यकीय तज्ज्ञांनी व्यक्त केली आहे. म्हणून नाशिकरोड रेल्वे स्थानकावर तात्काळ कोरोना तपासण्या सुरू करावे अशी मागणी होत आहे.

व्हिडिओ हर्षवर्धन - बोऱ्हाडे
#sakalmedia #nashik #maharashtra
Sakal Media Group is the largest independently owned Media Business in Maharashtra, India. Headquartered in Pune, Sakal operations span across newspapers, TV (SAAM TV), magazines, Internet, and Mobile. With a heritage of over 89 years Sakal Media Group Publishes the number 1 Marathi Newspaper in Maharashtra and also owns and operates its TV channel named SAAM TV.
Recommended