बावधन मिरवणुकीत कायद्याचे उल्लंघन करणा-यांवर कारवाई हाेईल : बाळासाहेब पाटील | Satara | Sakal Media |
  • 3 years ago
कोरोना संसर्गाचे रुग्ण आढळण्याचे प्रमाण वाढत आहे. रुग्णांच्या संपर्कात आलेल्यांची जास्तीत जास्त कोरोना टेस्टींग करावे, अशा सचूना करुन पालकमंत्री बाळासाहेब पाटील म्हणाले, शासनाने व प्रशासनाने घातलेल्या निर्बंधाची प्रभावीपणे अंमलबजावणी करावी. मास्क घालणार नाहीत अशा नागरिकांवर दंडात्मक कारवाई करावी. तसेच लग्न समारंभावर लक्ष ठेवावे. तसेच रात्री 8 नंतर 5 पेक्षा अधिक नागरिक एकत्र येणार नाहीत याचीही दक्षता पोलिसांनी घ्यावी.
जिल्हाधिकारी कार्यालयातील नियोजन भवनात आज कोरोना संसर्ग आढावा बैठक विधान परिषदेचे सभापती रामराजे नाईक-निंबाळकर यांच्या अध्यक्षतेखाली संपन्न झाली. यावेळी पालकमंत्री बाळासाहेब पाटील, गृह (ग्रामीण) राज्यमंत्री शंभूराज देसाई, खासदार श्रीनिवास पाटील, जिल्हा परिषदेचे अध्यक्ष उदय कबुले, आमदार शशिकांत शिंदे, आमदार मकरंद पाटील, आमदार दिपक चव्हाण, जिल्हाधिकारी शेखर सिंह, मुख्य कार्यकारी अधिकारी विनय गौडा, पोलीस अधीक्षक अजयकुमार बन्सल आदी उपस्थित होते.
यावेळी पालकमंत्री पाटील म्हणाले बावधन येथील बगाड यात्रा बाबत प्रशासनाने पुढाकार घेणा-यांना नाेटीसा दिल्या हाेत्या. ज्यांनी कायद्याचे उल्लंघन केले आहे त्यांच्यावर कारवाई हाेईल.
(Video - जिल्हा माहिती कार्यालय, सातारा)
Sakal Media Group is the largest independently owned Media Business in Maharashtra, India. Headquartered in Pune, Sakal operations span across newspapers, TV (SAAM TV), magazines, Internet, and Mobile. With a heritage of over 89 years Sakal Media Group Publishes the number 1 Marathi Newspaper in Maharashtra and also owns and operates its TV channel named SAAM TV.
Recommended