पीएमपीएल बस सेवा बंद; भाजप कार्यकर्ते आक्रमक |PMP Bus| BJP| Pune| Sakal Media |
  • 3 years ago
पुणे :  पीएमपीएल बस सेवा बंद केल्याने पुणेकरांची गैरसोय  होत असून भाजप कार्यकर्ते आक्रमक झाले आहे. खासदार गिरीश बापट यांच्या नेतृत्वाखाली  स्वारगेट पीएमपीएल डेपोसमोर या विरोधात आंदोलन सुरु करण्यात आले आहे. यावेळी भाजपचे शहरध्यक्ष जगदीश मुळीक येथे उपस्थित होते. दरम्यान, ''बस सुरूच केल्या पाहिजेत, शहराची आर्थिक घडी विस्कटली आहे.  योग्य काळजी घेऊन बस सुरू ठेवणे शक्य आहे. सत्ता आहे म्हणून मनमानी नको. राज्य सरकारला मदत करू. पण पोलिसांनी ही संयम बाळगला पाहिजे. शहराला खड्ड्यात घालू नका तातडीने बस सुरू करा अशी मागणी खासदार गिरीश बापट यावेळी केली. तसेच, ''उद्यापासून बस थांब्यावर नगरसेवक आंदोलन करणार आहेत. सगळे नियम पाळून आंदोलन करू.'' असा इशारा देत संचारबंदी रद्द करण्याचीही मागणी त्यांनी यावेळी केली.
#BJP #GirishBapat #PMP #Pune #Punekar

Sakal Media Group is the largest independently owned Media Business in Maharashtra, India. Headquartered in Pune, Sakal operations span across newspapers, TV (SAAM TV), magazines, Internet, and Mobile. With a heritage of over 89 years Sakal Media Group Publishes the number 1 Marathi Newspaper in Maharashtra and also owns and operates its TV channel named SAAM TV.
Recommended