होळीनिमित्त नाशिक गोदाकाठचा बाजार यंदा बंद.| Holi | Nashik | Maharrashtra | Sakal Media |
  • 3 years ago
नाशिक : कोरोनाच्या वाढत्या संक्रमणामुळे शनिवार आणि रविवार हा बंद पाळला जात आहे. शहरातील सगळ्या बाजारपेठा शनिवारी आणि रविवारी बंद करण्यात आल्या आहेत. व्यापारी वर्गाकडून या बंदला उत्तम प्रतिसाद मिळत आहे. गोदावरीवरील असणारी वर्दळ आपल्याला कमी दिसते आहे. अशातच उद्या (ता.२८) रविवारी होळीचा सण असल्यामुळे नाशिक शहरात विविध ठिकाणाहून गोवऱ्या विक्रीस येतात. संत गाडगे महाराज पुलाजवळील गवरी पटांगणावर गोवऱ्यांचा बाजार भरतो. दरवर्षी या ठिकाणी असे गोवऱ्यांचे ढिगारे पाहायला मिळतात. यावर्षी कोरोनाचे सावट असल्यामुळे सार्वजनिक होळ्या होतील किंवा नाही याबद्दल शंका आहे. परंतु घरगुती आणि छोट्या होळी साठी पाच, दहा, पंधरा, वीस अशा गोवऱ्या नेल्या जातात. एक रुपयापासून ते पाच रुपये पर्यंत एका गवरीची किंमत आहे. शंभर रुपये ते पाचशे रुपये शेकडा असा दर आहे. पण शनिवारी बंद असल्यामुळे या बाजारातही फारसे ग्राहक दिसत नाही. शनिवारी सकाळी हा बाजार थाटला होता.
(व्हिडिओ - सोमनाथ कोकरे)
Sakal Media Group is the largest independently owned Media Business in Maharashtra, India. Headquartered in Pune, Sakal operations span across newspapers, TV (SAAM TV), magazines, Internet, and Mobile. With a heritage of over 89 years Sakal Media Group Publishes the number 1 Marathi Newspaper in Maharashtra and also owns and operates its TV channel named SAAM TV.
Recommended