राळेगाव नगर पंचायत येथे झेंडा फडकविण्याचा मान एका स्वच्छतादूताला | Republic Day | Sakal Media |

  • 3 years ago
यवतमाळ जिल्ह्यातील राळेगाव येथे नगर पंचायत येथे प्रजासत्ताक दिनानिमित्त झेंडावंदन पार पडले . हे झेंडा आंदोलन खऱ्या अर्थाने वेगळे म्हणावे लागेल . यावेळी राळेगाव येथे येत्या काही दिवसात नगर पंचायत निवडणूक पार पडत आहे . यामुळे झेंडा फडकविण्याचा मान हा मुख्याधिकारी राळेगाव यांना होता . पण मनाचा मोठेपणा दाखवीत मुख्याधिकारी अरुण मोकळ यांनी हा मान चक्क स्वच्छता दूत रामू मेश्राम यांना दिला . रामू यांनी गेली 32 वर्षे राळेगाव स्वच्छ ठेवण्याचा विडा उचलला आहे . त्यांच्या या कार्याचा यथोचित सन्मान देत प्रजासत्ताक दिनी झेंडा फडकविण्याचा रामू यांना मान दिला . रामू हे पुढील वर्षी सेवानिवृत्त होत आहेत .
Sakal Media Group is the largest independently owned Media Business in Maharashtra, India. Headquartered in Pune, Sakal operations span across newspapers, TV (SAAM TV), magazines, Internet, and Mobile. With a heritage of over 82 years Sakal Media Group Publishes the number 1 Marathi Newspaper in Maharashtra and also owns and operates its TV channel named SAAM TV.

Recommended