अशक्य काही नसतं; दिव्यांग तरुणाने तयार केला स्वत:चा ब्रँड | Pune | Success Story | Sakal Media |
  • 3 years ago
कोल्हापुर जिल्ह्यातील इचलकरंजी शहरातील वरुण बरगाळे आणि त्याची पत्नी श्रुती या दाम्पताने यांनी अॅडोरेबल व्हाईट कलेक्शन हा स्वतःच ब्रॅड तयार केला आहे. विशेष म्हणजे दोघेही कर्णबधिर -मुकबधीर असूनही त्यांनी सर्व अडचणींवर मात करत आत्मनिर्भर झाले आहेत. इचंलकरंजीचे प्रसिध्द उत्तम गुणवत्तेचे कापड वापरुन त्यांनी पांढऱ्या रंगाचे कपड्यांचा व्यवसाय त्यांनी सुरु केला. उत्तम दर्जाचे शर्ट, कुर्ती आणि मास्कची उत्पादन आणि विक्री करत असून त्याला ग्राहकांचा उत्तम प्रतिसाद मिळत आहे.वरुणने त्यांच्यासारख्या आणखी कर्णबधीर, मुकबधीर तरुणांसाठी त्यांना आत्मनिर्भर बनविण्यासाठी त्याने पुढाकार घेतला आहे.पुणे, मुंबई, सातारा, नागपुर, हैदराबाद, अहमदनगर, धुळे, जळगाव, नेरुळ असा जवळपास महाराष्ट्र भर हा व्यवसायाची व्याप्ती वाढवली आहे. कर्णबधीर आणि कर्णबधीर व्यक्तीही सर्व सामन्यांप्रमाणे उत्तम दर्जाचे काम करु शकतात हे त्यांनी सिध्द केले आहे.

Sakal Media Group is the largest independently owned Media Business in Maharashtra, India. Headquartered in Pune, Sakal operations span across newspapers, TV (SAAM TV), magazines, Internet, and Mobile. With a heritage of over 82 years Sakal Media Group Publishes the number 1 Marathi Newspaper in Maharashtra and also owns and operates its TV channel named SAAM TV.
Recommended