औरंगाबादचे नामकरण होणं हा आमचा श्रद्धेचा विषय: चंद्रकांत पाटील | Chandrakant Patil | Pune | Sakal
  • 3 years ago
पुणे - भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी नवीन वर्षाच्या शुभेच्छा देत, नवीन वर्षाचा संकल्प केल्याचं सांगितलंय, नवीन वर्षात जास्त प्रवास करणार आणि पक्ष संघटना मजबूत करणार असल्याचं सांगितलंय, ग्रामपंचायत , नगरपालिका, नगरपरिषदा निवडणुका ताकदीनं लढणं आणि जिंकण हे उद्दीष्ट आहे,
2022 साली मुंबईत सत्ता आणणं हेच नवीन वर्षाच लक्ष्य आणि संकल्प आहे, मुंबई ही काही जणांची जहागिरी बनलीये, मात्र मुंबईच्या विकासाकडे दुर्लक्ष झालंय फक्त पैसै मिळवण एवढंच मुंबईत झालंय, असं म्हणत त्यांनी शिवसेनेवर निशाणा साधलाय, 2022 नंतर दोनच वर्ष राहतायेत, लोकसभा आणि विधानसभेला बघुयात असं चंद्रकांत पाटलांनी म्हणत पुढची रणनिती स्पष्ट केलीये.

Sakal Media Group is the largest independently owned Media Business in Maharashtra, India. Headquartered in Pune, Sakal operations span across newspapers, TV (SAAM TV), magazines, Internet, and Mobile. With a heritage of over 82 years Sakal Media Group Publishes the number 1 Marathi Newspaper in Maharashtra and also owns and operates its TV channel named SAAM TV.
Recommended