#HappyBirthdayRajeshKhanna : बॉलिवूडचा पहिला सुपरस्टार ..! | Rajesh Khanna | Superstar | Sakal |
  • 3 years ago
बाबु मोशाय, ज़िंदगी बड़ी होनी चाहिए…लंबी नहीं…हा डायलॉग बोलायचा पूर्ण व्ह्यायच्या आतच तुम्हाला समजलं असेल कि आज कोणाद्दल बोलणार आहे. हो राजेश खन्ना .बॉलिवूड चा पहिला सुपरस्टार अशी ओळख असलेल्या राजेश खन्ना यांचा जन्म २९ डिसेम्बर १९४२ रोजी झाला. त्यांचं मूळ नाव जतीन खन्ना. त्यांच्या सुरवातीच्या काळाबद्दल बोलायचे झाले तर १९६५ साली एका टॅलेंट हंट स्पर्धेत त्यांनी भाग घेतला आणि ती स्पर्धा त्यांनी जिंकली . स्पर्धेचे आयोजक होते फिल्मफेअर आणि युनायटेड प्रोड्युसर . आणि बक्षीस म्हणून त्यांना थेट मिळाला चित्रपटसृष्टीत पहिला ब्रेक पिक्चरचं नाव आखरी खत जो दिगदर्शित केला होता चेतन आनंद यांनी. या चित्रपटाची १९६७ साली ऑस्करसाठी सुद्धा शिफारस करण्यात आली आणि फिल्म इंडस्ट्रीला मिळाला पहिला सुपरस्टार .
#rajeshkhanna #superstar #bollywood #filmstar #oldmovies #cinema #hindicinema
Sakal Media Group is the largest independently owned Media Business in Maharashtra, India. Headquartered in Pune, Sakal operations span across newspapers, TV (SAAM TV), magazines, Internet, and Mobile. With a heritage of over 82 years Sakal Media Group Publishes the number 1 Marathi Newspaper in Maharashtra and also owns and operates its TV channel named SAAM TV.
Recommended