पारधी बेड्याची नवी ओळख आता समशेरनगर |आजच्या ठळक बातम्या | मराठी ताज्या बातम्या | Sakal Media |
  • 3 years ago
उमरेड (जि. नागपूर) ः महान क्रांतिवीर समशेर सिंग भोसले यांच्या नावाने ९ ऑगस्ट २०२० रोजी नागपूर जिल्ह्याच्या उमरेड तालुक्यातील चांपा पारधी बेड्याचे नामकरण करण्यात आले. आजवर पारधी बेडा असा जातिवाचक उल्लेख या वस्तीचा होत होता. परंतु, पारधी समाजातील उच्चशिक्षित युवा अतिश पवार सरपंच होताच नागरिकांमध्ये आत्मविश्वास भरण्याचा प्रयत्न त्यांनी सुरू केला आहे. त्यांच्याच पुढाकारातून पारधी बेड्याचे नाव बदलविण्यात आले. त्यांचे मामा आणि सामाजिक कार्यकर्ते बबनराव भोसले यांनी पारधी बेडा नामांतराची चळवळ २०१४ मध्ये सुरू केली होती. या वस्तीचे नामातरण होताच एक मोकळा श्वास समशेर नगरने घेतला. रोटी फाउंडेशनचे प्रमुख डाॅ. रोहित माडेवार यांच्या पुढाकारातून समशेर नगरात समशेर सिंग भोसले यांचा पूर्णाकृती पुतळाही उभारण्यात आला. (व्हिडिओ- अनिल पवार)

Sakal Media Group is the largest independently owned Media Business in Maharashtra, India. Headquartered in Pune, Sakal operations span across newspapers, TV (SAAM TV), magazines, Internet, and Mobile. With a heritage of over 82 years Sakal Media Group Publishes the number 1 Marathi Newspaper in Maharashtra and also owns and operates its TV channel named SAAM TV.
Recommended