शहीद जवान सुजित किर्दत, नागनाथ लोभे यांना लष्कराकडून सलामी | Pune | Indian Army | Martyr | Sakal

  • 3 years ago
पुणे : शहीद जवान सुजित किर्दत यांचं पार्थिव सातारयाकडे रवाना तर शहीद जवान लोभे नागनाथ यांचं पार्थिव लातूरकडे रवाना करण्यात आले आहे. दोन्ही जवानाची पार्थिव पुण्यात आणण्यात आली असून पुणे विमानतळावर लष्कराकडून त्यांना सलामी देण्यात आली. इ. जी. कमांडड ब्रिगेडियर एम. जे. कुमार व इतर 5 लष्करी अधिकारी यांनी श्रद्धांजली वाहून जवानांनी सलामी दिली. सातारा तालुक्यातील चिंचणेर निंब येथील जवान सुजित किर्दत शहीद झाले आहेत तर लातूरमधील जवान लोभे नागनाथ सिक्कीममध्ये कार्यरत होते. सुजित किर्दत 106 इंजिनिअर रेजिमेंट सिक्किम याठिकाणी ड्युटीवर होते. ड्युटी बजावत असताना बर्फावरुन जिप्सी गाडी घसरुन दरीत कोसळली यामध्ये सुजित किर्दत व नागनाथ लोभे यांना वीरमरण आले आहे. सुजित यांचं पार्थिव आता पुण्यातून साताराकडे रवाना करण्यात आलं तर लोभे यांचं पार्थिव लातूरकडे रवाना करण्यात आलं.
#IndianArmy #Martyr #Pune #Maharashtra #Sakal #SakalMedia
Sakal Media Group is the largest independently owned Media Business in Maharashtra, India. Headquartered in Pune, Sakal operations span across newspapers, TV (SAAM TV), magazines, Internet, and Mobile. With a heritage of over 82 years Sakal Media Group Publishes the number 1 Marathi Newspaper in Maharashtra and also owns and operates its TV channel named SAAM TV.

Recommended