विदर्भात धान्य , कापूस पिकांना मोठी पसंती.! | Chandrapur | Maharashtra | Sakal Media |

  • 3 years ago
गोंडपिपरी (जि. चंद्रपूर) ः यंदा कापूस, धान पिकांना मोठा फटका बसला. उत्पन्न अर्ध्यावर आले. यंदा हिवऱ्याच्या एका शेतकऱ्याने तब्बल सहा एकरात तुरीच उत्पन्न घेतल. त्याला बराच फायदा झाला. गोंडपिपरीचे तालुका कृषी अधिकारी मंगेश पवार यांनी त्या शेतकऱ्यांच्या शेताला भेट देत पिकाची पहाणी केली. संजय चहारे हे हिवरा येथील तरुण शेतकरी आहे. परिसरात शेतकरी बांधव कापसाच उत्पन्न घेत असताना त्यांनी सहा एकरात तुळीच्या पिकाच नियोजन केले. सध्या त्यांच पीक अतिशय उत्तम अवस्थेत आहे. सहा एकरातून साधारणत पाच ते सहा लाख रुपयांचे उत्पन्न निघेल अशी अपेक्षा आहे. सध्या पूर्व विदर्भात धान, कापूस पिकांना मोठी पसंती दिली जात आहे. (व्हिडिओ - संदीप रायपुरे)
Sakal Media Group is the largest independently owned Media Business in Maharashtra, India. Headquartered in Pune, Sakal operations span across newspapers, TV (SAAM TV), magazines, Internet, and Mobile. With a heritage of over 82 years Sakal Media Group Publishes the number 1 Marathi Newspaper in Maharashtra and also owns and operates its TV channel named SAAM TV.

Recommended