मोठी कारवाई : सांगवी पोलिस स्टेशन झालं गॅस सिलिंडर गोडाऊन; 22 जण ताब्यात | Pune | Sakal Media |
  • 3 years ago
घरगुती गॅस सिलिंडर चोरणाऱ्यांच्या टोळीवर आज मोठी कारवाई करत ताब्यात घेण्यात आले. पिंपरी-चिंचवड शहर सामाजिक सुरक्षा पथकाकडून ही कारवाई करण्यात आली.या कारवाईनंतर सांगवी पोलिस ठाण्याला चक्क गॅस गोडाऊनचे स्वरूप आले आहे. कारण या कारवाईमध्ये रिकामे आणि भरलेले असे तब्बल ३८१ गॅस सिलिंडर जप्त करण्यात आले आहेत.संबंधित आरोपी हे भैरवनाथ गॅस एजन्सी आणि कांकरिया गॅस एजन्सीमधील कर्मचारी असल्याचं समोर आले आहे. जवळापास पंचवीस लाखांचा मुद्देमाल त्यांच्याकडून जप्त करण्यात आला आहे. याप्रकरणी एकूण 22 जणांना ताब्यात घेतले असून ही कारवाई सांगवी परिसरात करण्यात आली आहे. पिंपरी-चिंचवड शहर पोलिस आयुक्तांनी सांगवी पोलिस ठाण्यात भेट देत या कारवाई बाबत खुलासा करुन माहिती दिली.
Sakal Media Group is the largest independently owned Media Business in Maharashtra, India. Headquartered in Pune, Sakal operations span across newspapers, TV (SAAM TV), magazines, Internet, and Mobile. With a heritage of over 89 years Sakal Media Group Publishes the number 1 Marathi Newspaper in Maharashtra and also owns and operates its TV channel named SAAM TV.
Recommended