पुण्यात झाले ढगाळ वातावरण; डिसेंबरमध्ये पावसाची शक्यता | Pune | Sakal Media |
  • 3 years ago
पुणे : गेले दोन दिवस पुण्यात संमिश्र हवामानानंतर रविवारी शहरात ढगाळ हवामान आणि धुके दाटले आहे. त्यामुळे पुण्यात आज पाऊस पडण्याची शक्यता आहे. अरबी समुद्रावरून होत असलेल्या बाष्पाच्या पुरवठ्यामुळे राज्यातील काही भागांत ढगाळ हवामान होत आहे. यामुळे गारठा काहीसा कमी झाला आहे. येत्या तीन ते चार दिवस कोकण, मध्य महाराष्ट्र, विदर्भात हलक्या पावसाचा अंदाज आहे. तर उत्तर महाराष्ट्रात तुरळक गारपीट होण्याचा इशाराही हवामान विभागाने दिला आहे.

ऑक्टोबरमध्ये परतीचा मॉन्सून गेल्यानंतर दक्षिणेकडील समुद्रामध्ये नोव्हेंबर महिन्यात आणि डिसेंबरच्या सुरुवातीपासून चक्रीवादळांची साखळी तयार झाली. एका पाठोपाठ आलेल्या ‘गती’, ‘निवार’ आणि ‘बुरेवी’ चक्रीवादळांनंतर आता अरबी समुद्राच्या दक्षिण भागात हवेचे कमी दाबाचे क्षेत्र सक्रिय आहे. त्याचा परिणाम राज्यातील वातावरणावर होत आहे. तर अफगाणिस्तान आणि परिसरावर असलेल्या पश्‍चिमी चक्रावातमुळे हिमालयाच्या पायथ्यालगतच्या भागात हिमवृष्टी होत आहे. पंजाब, हरियाना, चंडीगड आणि दिल्ली राज्यांतही पाऊस पडत आहे.
Sakal Media Group is the largest independently owned Media Business in Maharashtra, India. Headquartered in Pune, Sakal operations span across newspapers, TV (SAAM TV), magazines, Internet, and Mobile. With a heritage of over 82 years Sakal Media Group Publishes the number 1 Marathi Newspaper in Maharashtra and also owns and operates its TV channel named SAAM TV.
Recommended