आधारभूत धान नोंदणी, खरेदी केंद्राचा शुभारंभ | Live Marathi News | मराठी ताज्या बातम्या | Sakal Media
  • 3 years ago
वेलतूर (जि. नागपूर) : वेलतूर (बोथली) येथे विजय राईस मिलच्या अवारात आधारभूत धानखरेदी व नोंदणी केद्राची सुरुवात करण्यात आली. यावेळी बहुसंख्येने परिसरातील धान उत्पादक शेतकरी उपस्थित होते. नगदी व पारंपरिक पीक म्हणून धान पिकाला पहिली पंसंती आहे. मात्र, बाजारपेठेअभावी शेतकरीवर्गाची विक्री संदर्भात मोठ्या अडचणी होत्या. या केंद्रात शासकीय दरात धान खरेदी होणार असल्याने शेतकरीवर्गाला शासनाच्या अनेक सोईसवलती सुध्दा मिळणार असल्याने शेतकरीवर्गात आनंदाचे वातावरण आहे. दोन वर्षांपासून धान आधारभूत खरेदी केंद्र सुरू व्हावे अशी मागणी होती.
(व्हिडिओ - शरद शहारे)
Sakal Media Group is the largest independently owned Media Business in Maharashtra, India. Headquartered in Pune, Sakal operations span across newspapers, TV (SAAM TV), magazines, Internet, and Mobile. With a heritage of over 82 years Sakal Media Group Publishes the number 1 Marathi Newspaper in Maharashtra and also owns and operates its TV channel named SAAM TV.
Recommended