सकाळ पॉकेट अपडेट्स | Marathi News | Top 10 News | India | Maharashtra | Sakal Media
  • 3 years ago
सकाळच्या पॉकेट अपडेट्स मध्ये आपण जाणून घेणार आहोत तीन मिनटात टॉप १० न्यूज. त्या सर्व बातम्या वाचण्यासाठी खाली दिलेल्या लिंकवर क्लिक करून सविस्तर बातम्या वाचायला मिळतील.
www.esakal.com
1. अन्वय नाईक यांना आत्महत्येसाठी प्रवृत्त केल्याप्रकरणी अटक करण्यात आलेल्या रिपब्लिक वाहिनीचे मुख्य संपादक अर्णब गोस्वामी यांना सुप्रीम कोर्टाने दिलासा दिलाय. सुप्रीम कोर्टाने अर्णब गोस्वामी यांना अंतरिम जामीन मंजूर केलाय.

2.यापुढे देशातील ऑनलाइन चित्रपट, ऑडिओ व्हिज्युएल कार्यक्रम, बातम्या आणि चालू घडामोडीचा आशय पुरवणाऱ्या ऑनलाइन माध्यमांवर केंद्र सरकारचा अंकुश राहणाराय. त्यामुळे आता नेटफ्लिक्स, अ‍ॅमेझान प्राइम, हॉट स्टारसारख्या ओटीटी फ्लॅटफॉर्मच्या कंटेटवर माहिती आणि प्रसारण मंत्रालयाची करडी नजर असेल.

3. मुंबईला कोरोनाचा सर्वाधिक फटका बसलाय. कोरोनाचा प्रसार रोखण्यासाठी प्रशासनानं अथक प्रयत्न केले. त्यात आता याच प्रयत्नांचे सकारात्मक निकाल दिसून येतायेत. एकेकाळी कोरोनासाठी हॉटस्पॉट ठरलेल्या धारावीतून आनंदाची बातमी समोर आलीये. धारावीत मंगळवारी केवळ एका रुग्णांची भर पडलीये.

4. देशपातळीवर मोदी लाट रोखण्यासाठी मजबूत आघाडी झाली पाहिजे. त्यात काँग्रेसला नेतृत्वहीन पद्धतीने सहभागी करुन घेता येईल, लोक कॉग्रेसच्या मागे जात नाही हे बिहार निवडणुकीने दाखवून दिलय. तेजस्वी यादव, ममता, पटनायक, किंवा अन्य कुणीही या विरोधी आघाडीचे नेतृत्व करावे अशी अपेक्षा वंचित बहुजन आघाडीचे नेते ॲड प्रकाश आंबेडकर यांनी व्यक्त केलीये.

5. बिहार विधानसभा निवडणुकीमध्ये एनडीएला स्पष्ट बहुमत मिळालंय. पण, जेडीयू छोट्या भावाच्या भूमिकेत आलाय. एनडीएकडून नितीश कुमार हेच मुख्यमंत्री असतील याबाबत कोणतेही कन्फ्यूजन नसल्याचं भाजपनं स्पष्ट केलंय. आम्ही आमचे वचन पूर्ण करणार, असं भाजपचे वरिष्ठ नेते सुशील कुमार मोदी म्हणालेत.


6. अन्वय नाईक आत्महत्या प्रकरणी अर्णब गोस्वामी यांना अटक करण्यात आली होती. त्यांच्या अटकेवरुन सध्या राज्यात नवा वाद उभा राहिलाय. भाजपचे नेते किरीट सोमय्या यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या पत्नी रश्मी ठाकरे आणि अन्वय नाईक कुटुबांतील व्यवहारावरून गौप्यस्फोट केलाय. रश्मी ठाकरे यांनी अन्वय न
Recommended