आषाढी एकादशी विशेष । सकाळ प्रकाशन । Latest Marathi News I Live Marathi News | Sakal Media |
  • 3 years ago
ज्ञानोबा माऊली तुकाराम असे म्हणत दरवर्षी लाखो सश्रद्ध पावले आषाढी एकादशीच्या दिवशी पंढरपूरला पोहोचतात. वारकरी संप्रदायाचा हा भागवत धर्मोत्सव. या निमित्ताने संतांची आठवण, त्यांच्या ग्रंथांचे पठण आणि त्यांच्या चरित्राचे स्मरण आपण करायला हवे. त्यासाठीच सकाळ प्रकाशनातर्फै लवकरच प्रसिद्ध होत आहे संत निवृत्तिनाथांच्या अलौकिक जीवनावर आधारित कादंबरी - ज्ञानसूर्याचे आकाश. ज्ञानदेव, सोपान आणि मुक्ताबाईचा थोरला भाऊ आणि त्यांचे गुरू एवढ्यापुरतीच निव्रृत्तिनाथांची ओळख मर्यादित नाही. नाथ संप्रदायाची दीक्षा घेतल्यानंतरही त्यांनी समाज कल्याणाच्या हेतूने भागवत धर्माच्या स्थापनेसाठी पुढाकार घेतला. बाळपणी मातापित्याचे छत्र गमावलेल्या भावंडांची ते आई बनले. समाजाकडून मिळालेली कडवट वागणूक त्यांनी आचरणात प्रतिबिंबित होऊ दिली नाही. ज्ञानेश्वरी लेखनाचे प्रेरणास्थान ठरलेल्या अशा अलौकिक निवृत्तिनाथांच्या जीवनाचा प्रसिद्ध लेखिका आणि संत साहित्याच्या अभ्यासक मंजुश्री गोखले यांनी कादंबरीच्या स्वरूपात घेतलेला धांडोळा - ज्ञानसूर्याचे आकाश लवकरच प्रसिद्ध होत आहे. आषाढी एकादशीच्या निमित्ताने संतसाहित्यरूपी आकाशात तळपणार्या सर्व संतांचे स्मरण करून विठुनामाचा गजर करूया. जयहरी विठ्ठल.
Sakal Media Group is the largest independently owned Media Business in Maharashtra, India. Headquartered in Pune, Sakal operations span across newspapers, TV (SAAM TV), magazines, Internet, and Mobile. With a heritage of over 82 years Sakal Media Group Publishes the number 1 Marathi Newspaper in Maharashtra and also owns and operates its TV channel named SAAM TV.
Recommended