चंद्रपुरात आहे ब्रिटिशांचे आवडते शिकारीचे स्थळ | ठळक बातम्या | मराठी ताज्या बातम्या | Sakal Media |
  • 3 years ago
धाबा (जि. चंंद्रपूर) : ब्रिटिशकाळात चांदागडातील वने घनदाट अन् भीतीयुक्त होते. येथील उंच वृक्ष सूर्य किरणांना अटकाव घालीत होते. या किर्र जंगलात जाण्यासाठी गावकरीही घाबरायचे. या जंगलात वन्यजिवांचा मोठा आवास होता. हिस्त्रपशूंची शिकार करण्याची आवड असलेल्या ब्रिटिशांची येथे मोठी रेलचेल होती. दूरवरून ब्रिटिश येथे शिकारीसाठी येत असतं. चंद्रपूर जिल्ह्यातील कन्हाळगाव प्रमाणेच वामणपल्ली हे ब्रिटिशांचे आवडते शिकारीचे ठिकाण होते. शिकारीसाठी येथे खुली परवानगी होती. शिकारीचा अनेक रंजक कथा वामणपल्ली वनक्षेत्रात घडल्या आहेत. बंदुकीचा आवाज येथील गावकऱ्यांना परिचित आहे. शिकारीला आलेले ब्रिटिश जिथे थांबायचे ती घरे आता जमीनदोस्त झाली आहेत. मात्र, ब्रिटिशांनी केलेल्या शिकारींच्या थरारक कथा आजही येथील वृद्धांच्या ओठावर आहेत. (व्हिडिओ - नीलेश झाडे)

Sakal Media Group is the largest independently owned Media Business in Maharashtra, India. Headquartered in Pune, Sakal operations span across newspapers, TV (SAAM TV), magazines, Internet, and Mobile. With a heritage of over 82 years Sakal Media Group Publishes the number 1 Marathi Newspaper in Maharashtra and also owns and operates its TV channel named SAAM TV.
Recommended