फळभाजी विक्रेत्यांनी दिला बेमुदत बंदचा इशारा| आजच्या ठळक बातम्या | मराठी बातम्या | Sakal Media |
  • 3 years ago
उमरेड (जि. नागपूर) : काही दिवसांपासून उमरेड तालुक्यासोबतच शहरात देखील कोरोनाचा प्रादुर्भाव बघावयास मिळत आहे. अशातच नगर परिषदच्या वतीने वर्दळीच्या चौकांमध्ये तसेच रस्त्याच्या कडेला फळभाज्या विकी करणाऱ्या दुकानांवर नागरिक खरेदीसाठी मोठ्या प्रमाणात गर्दी करीत असल्याचे आढळून आले. तेव्हा प्रशासनाने वेळोवेळी जाहीर सूचना देत फळभाजी विक्रीची दुकाने मोठ्या भाजी मंडित उभारण्याचे आदेश दिले. मात्र, फळभाजी विक्रेत्यांनी त्या आदेशाचा विरोध दर्शवत शनिवारी सकाळपासून बेमुदत बंदची हाक दिली. आम्हाला आमची दुकाने जिथे होती तिथेच पूर्ववत सुरू करण्याची परवानगी देण्यात यावी अशी मागणी फळभाजी विक्रेते करताना दिसून आले. (व्हिडिओ : सतीश तुळसकर)

Sakal Media Group is the largest independently owned Media Business in Maharashtra, India. Headquartered in Pune, Sakal operations span across newspapers, TV (SAAM TV), magazines, Internet, and Mobile. With a heritage of over 82 years Sakal Media Group Publishes the number 1 Marathi Newspaper in Maharashtra and also owns and operates its TV channel named SAAM TV.
Recommended