कृषी अधिकाऱ्यांनी शेतकऱ्यांना दिला सल्ला | आजच्या ठळक बातम्या | मराठी ताज्या बातम्या | Sakal Media |
  • 3 years ago
उमरेड (जि. नागपूर) : तालुकाअंतर्गत येणाऱ्या मौजा खुर्सापार येथील शेतकरी गजानन घाडगे हे मागील ५-६ वर्षांपासून रुंदसरी वरंबा (bbf) पद्धतीने सोयाबीन, हरभरा पिकाची पेरणी करतात. त्यांची यशोगाथा तालुका कृषी अधिकारी संजय वाकडे यांनी त्यांच्या बांधावर जाऊन तालुक्यातील अन्य शेतकऱ्यांच्या समक्ष मांडण्याचा प्रयत्न केला. रुंदसरी वरंबा पद्धतीचा अवलंब केल्याने उत्पादनामध्ये १५ ते २० टक्के वाढ झाली आहे. तसेच बियाण्यांमध्ये ८ ते १० किलो प्रति एकर बचत होते आणि भुसभुशीत गादी वाफा तयार झाल्याने पिकांना पोषक वातावरण मिळून वाढ होते. (व्हीडिओ : सतीश तुळसकर)

Sakal Media Group is the largest independently owned Media Business in Maharashtra, India. Headquartered in Pune, Sakal operations span across newspapers, TV (SAAM TV), magazines, Internet, and Mobile. With a heritage of over 82 years Sakal Media Group Publishes the number 1 Marathi Newspaper in Maharashtra and also owns and operates its TV channel named SAAM TV.
Recommended