बाल गोपालांनी गणपतीसमोर उभा केला ग्रामीण संस्कृतीचा देखावा | Marathi News I मराठी ताज्या बातम्या |
  • 3 years ago
उमरेड (जि. नागपूर) : महाराष्ट्राच्या संत मालिकेतील कवयित्री संत जनाबाई ओवीबद्ध पद्धतीने जात्यावर दळण दळताना, संत बहिणाबाई विहिरीतून पाणी काढताना, शेजारीच गाईच्या गोठ्यात बैलजोडी, अश्व एकत्रित वैरणीचा आनंद घेताना. दुसऱ्या बाजूला खरीप हंगामातील नगदी पीक म्हणून ओळ्खल्या जाणारे (पांढरे सोने) कापसाने भरलेला बैलगाडा, भगवान श्रीकृष्ण यांच्या पालनकर्त्या माता यशोदा ताक घुसळताना, संत सखुबाई पाट्यावर मसाले वाटताना, सत्यभामा माता सुपात तांदूळ पाखळताना तर अन्नपूर्णा माता पोळ्या लाटताना. एकूणच अशा लोप पावणाऱ्या भारतीय संस्कृतीचे दर्शन देखाव्यातून बाल गोपालांनी निर्माण केले आहे.
(व्हिडिओ - सतीश तुळसकर)
Sakal Media Group is the largest independently owned Media Business in Maharashtra, India. Headquartered in Pune, Sakal operations span across newspapers, TV (SAAM TV), magazines, Internet, and Mobile. With a heritage of over 82 years Sakal Media Group Publishes the number 1 Marathi Newspaper in Maharashtra and also owns and operates its TV channel named SAAM TV.
Recommended