आता तरी सुधरा रे... I Marathi News I Live Marathi News | ठळक बातम्या | ताज्या बातम्या | Sakal Media
  • 3 years ago
नागपूर : नागपूरकर फिटनेसच्या बाबतीत खुपच जागरूक झाले आहेत. सकाळच्या सुमारास सिव्हिल लाइन्स परिसरातील रस्त्यांवर कदमताल करणाऱ्यांना पाहून तो अनुभव येतो. मात्र, 'मॉर्निंग वॉक' करताना 'सोशल डिस्टन्सिंग'चा अक्षरश: फज्जा उडविला जात आहे. बहुतांश जण मास्क न घालताच 'वॉक' करीत असल्याचे चित्र रामगिरीवर दिसून आले. कमी-अधिक प्रमाणात शहरात सगळीकडेच ही स्थिती पाहायला मिळते. महापौरांनी 'जनपा कर्फ्यू'ची घोषणा केली. मनपा आयुक्‍तांनीही पुन्हा लॉकडाउनचे संकेत दिलेत. अशावेळी लॉकडाउनचे संकट टाळायचे असेल तर नागपूरकरांना संयम पाळावाच लागणार आहे.
(व्हिडिओ : प्रतीक बारसागडे)

Sakal Media Group is the largest independently owned Media Business in Maharashtra, India. Headquartered in Pune, Sakal operations span across newspapers, TV (SAAM TV), magazines, Internet, and Mobile. With a heritage of over 82 years Sakal Media Group Publishes the number 1 Marathi Newspaper in Maharashtra and also owns and operates its TV channel named SAAM TV.
Recommended