विदर्भ आणि नागपूरच्या महत्वाच्या बातम्या

  • 3 years ago
नागपूर ः उपराजधानीत कोरोना विषाणूचा प्रकोप वाढत असून, या आठवड्यात तब्बल अडीचशे कोरोनाबाधित आढळले आहेत. सोमवारी देखील सकाळच्या सत्रात 29 जण कोरोनाबाधित आढळले. त्यामुळे बाधितांचा आकडा 1 हजार 34 वर पोहचला आहे.

यवतमाळ ः सध्या पावसाळ्याचे दिवस असल्याने नागरिकांनी कोरोनाचा संसर्ग रोखण्यासाठी स्वतः ची व स्वतः च्या कुटुंबाची काळजी घ्यावी, असे आवाहन जिल्हाधिकारी एम. देवेंदर सिंह यांनी सोमवारी केले. पुसद येथील 60 वर्षीय कोरोना झालेल्या ज्येष्ठ नागरिकाचा सोमवारी सकाळी उपचारादरम्यान मृत्यू झाला. या पार्श्‍वभूमीवर जिल्हाधिकाऱ्यांनी एक व्हिडीओ प्रसारित करून नागरिकांना कोरोनाचा संसर्ग रोखण्यासाठी विशेष काळजी घेण्याचे आवाहन केले.

वर्धा : ऐन पेरणीचा हंगाम तोंडावर असताना वर्धा जिल्ह्यातील शेतकरी बॅंकेच्या व्यवहाराने त्रस्त झाले आहेत. कोरोनाच्या संसर्गामुळे कापूस संकलन केंद्र आणि नाफेडब ची खरेदी अतिशय मंद गतीने सुरू असून पुढील हंगामात पेरणी करायला पैसा आणावा कुठून? हा प्रश्‍न शेतकऱ्यांसमोर असतांना बॅंकेच्या विचित्र धोरणाने जिल्ह्यातील शेतकरी अडचनीत सापडले आहेत.

गडचिरोली ः जिल्ह्यातील कुलभट्टी येथील दारूविक्री बंद व्हावी, यासाठी तालुक्‍यातील मुरूमगाव आणि हिरंगे येथील महिलांनी या गावी जात दारू सोड नाहीतर वाजवू ढोल अशी तंबी देत अनोखे बाजा बजाओ आंदोलन केले. या आंदोलनात तीनही गावांतील जवळपास 60 महिला व पुरुष सहभागी झाले होते.

#Nagpur #NagpurNews #Vidarbha #VidarbhaNews #News #SakalNews #Sakal #MarathiNews #Amravati #Yavatmal #Bhandara #Gondia #Chandrapur #Gadchiroli #Wardha