विदर्भ आणि नागपूरच्या शुक्रवारचच्या महत्वाच्या घडामोडी

  • 3 years ago
नागपूर : उपराजधानीत दर दिवसाला वाढत असलेला कोरोनाबाधितांचा आकडा आता खालीवर होत आहे. कधी पन्नास तर कधी साठ रुग्ण वाढल्याचा उच्चांकी आकडा दिसत होता. मात्र, आता कोरोनामुक्त होणाऱ्यांची संख्या वाढली आहे. नागपूरात पाचपेक्षा अधिक पटीने कोरोनावर मात करणाऱ्यांची संख्या वाढली असल्यामुळे प्रशासनाने समाधान व्यक्त केले आहे. 

नागपूर : भरमसाट बिलामुळे वीजग्राहकांमध्ये प्रचंड असंतोष पसरला आहे. महावितरणच्या तुळशीबाग उपविभागीय कार्यालयात ग्राहकांच्या संतापाचा अचानक भडका उडाला. त्यातून सुरक्षारक्षकाचे कपडे फाडून मारहाण करण्यात आली. 

चंद्रपूर : चंद्रपूर जिल्ह्यात आजीच्या नावावर असलेली शेती आपल्या नावावर करून द्यावी, या कारणावरून नातवाचा आजीशी वाद होता. 24 जूनला याच कारणाने आजी-नातवात वाद झाला. रागाच्या भरात नातवाने लाकडी दांड्याने आजीवर हल्ला चढविला. यात आजीचा मृत्यू झाला.

अचलपूर (जि. अमरावती) : सरकारने गरीबांना दोन वेळचे खायला तरी मिळावे, या उद्देशाने अनेक योजना सुरू केल्या. स्वस्त धान्य योजना सुरू केली, मात्र रेशनचे हे धान्य गरीबांच्या पोटात जाण्याऐवजी त्याचा काळाबाजार सुरू असल्याने सरकारच्या या योजनेला हरताळ फासला जात असल्याचे लक्षात येते.
त्यातच कोरोनाच्या संकटात रेशनवरील धान्य वाटपासंबंधी आरोप-प्रत्यारोप सुरू असतानाच यातील तांदळाचा काळाबाजार केला जात असल्याचे समोर आले आहे

नागपूर : जगप्रसिद्ध लोणार सरोवराच्या अचानक बदललेल्या रंगाची दखल अमेरिकेच्या नासा ने घेतली आहे. "नासा' च्या पृथ्वी निरीक्षण प्रणालीने लोणार सरोवराच्या पाण्याचे बदललेले रंग आणि रंग बदलण्यापूर्वीचे फोटो आपल्या सोशल मीडियावर प्रसिद्ध केले आहेत.

#Nagpur #NagpurNews #Vidarbha #VidarbhaNews #News #SakalNews #Sakal #MarathiNews #Amravati #Yavatmal #Bhandara #Gondia #Chandrapur #Gadchiroli #Wardha

Recommended