अकोला रेल्वे स्थानकावरून आजपासून चार गाड्या

  • 3 years ago
अकोला : कोरोना विषाणूचा प्रादूर्भाव होऊ नये म्हणून देशभरात लॉकडाऊन सुरू करण्यात आला. याच धर्तीवर देशभरातील सर्व प्रवासी रेल्वेगाड्याही बंद करण्यात आला. दरम्यान प्रचंड वर्दळ असणाऱ्या रेल्वे स्थानकांवर शुकशुकाट पहायला मिळाला. अकोला येथील जंक्शनवर याचदरम्यान एकही प्रवासी गाडी धावली नसल्याने स्थानकाच्या चारही प्लॅटफॉर्मवर शुकशुकाट होता. मात्र, आजपासून अकोला रेल्वे स्थानकावरून चार रेल्वे गाड्या सुरू होणार आहेत. यामध्ये गाडी क्रमांक ०२८०९ मुंबई ते हावडा (अकोला येथे येण्याची वेळ सकाळी सहा वा. पाच मिनिट), गाडी क्रमांक ०२८३३ अहमदाबाद ते हावडा (दुपारी १३ वा २५ मि.),
गाडी क्रमांक ०२८१० हावडा ते मुंबई (सायं. १८वा. ४० मि.), गाडी क्रमांक ०२८३४ हावडा ते अहमदाबाद (रात्री २३ वा १५ मि.) या प्रमाणे गाड्या सुरू होत असल्याची माहिती स्टेशन प्रबंधकांनी दिली. याठिकाणी येणाऱ्या-जाणाऱ्या प्रवाशांची आरोग्य तपासणी करण्यात येणार आहे. त्यासाठी प्रशासनाने सज्जता केली आहे.
(व्हिडिओ - अमित गावंडे, अकोला)
#Railway #platform #Akola #Vidharbha #AkolaRailway #MarathiNews #SakalNews #EsakalNews #Viral

Recommended