Skip to playerSkip to main contentSkip to footer
  • 5/28/2025
पुणे : राज्यासह पुणे जिल्ह्यात गेल्या दोन ते तीन दिवसांपासून होत असलेल्या मुसळधार पावसामुळे पुणे शहराला पाणीपुरवठा करणारे खडकवासला धरण आता अर्धे म्हणजे ५० टक्के भरले आहे. यंदा मे महिन्यातच मान्सून दाखल झाल्यामुळे, गेल्या काही दिवसांपासून सततच मुसळधार पाऊस पडत आहे. त्यामुळे मे महिना संपण्यापूर्वीच खडकवासला धरण 49 टक्के भरल्याने पुणेकरांची चिंता मिटली आहे. एप्रिल आणि मे महिन्याच्या सुरुवातीला पुणे शहरातील अनेक भागांमध्ये पाणी कपात करण्यात आली होती. मात्र आता धरण पाणलोट क्षेत्रामध्ये पाणी पातळीत वाढ होत असल्यामुळे पाणीकपातीचा निर्णय लवकरच मागे घेण्याची शक्यता आहे. पुणे शहराला पाणीपुरवठा करणाऱ्या मुख्य धरणांपैकी एक असलेल्या खडकवासला धरणात 48.86% इतका पाणीसाठा आहे. म्हणजेच जवळपास हे धरण आता अर्धे भरले आहे. पुणे शहराला पाणीपुरवठा करणाऱ्या धरणांमधील खडकवासला धरणात ४८.८६ टक्के, पानशेत धरणात १७.७८, वरसगाव : २१.२४, टेमघर : ०३.८८ अशा चारही धरणातील एकूण पाणी साठा १९.६४ टक्के टी एम सी झाला आहे.

Category

🗞
News
Transcript
00:00okay
00:05so
00:09So, let's go.

Recommended