लोककलांच्या माध्यमातून समाजप्रबोधन करणारी कृष्णाई उळेकर | गोष्ट मुंबईची भाग ३५

  • last year
महाराष्ट्राला लाभलेला समृद्ध लोककलेचा वारसा जपण्यासाठी कृष्णाई उळेकर ही तरुणी वयाच्या दहाव्या वर्षापासून या क्षेत्रात काम करत आहे. कृष्णाई ही मुळची आर्ली बुद्रुक (ता. तुळजापूर, जि. धाराशिव) येथील आहे. लोककलांच्या माध्यमातून स्त्री भ्रूणहत्या, शेतकरी आत्महत्या, हुंडाबळी अशा सामाजिक विषयांवर ती समाजप्रबोधन करते. याच विषयामध्ये तिचं अध्यापन व संशोधन कार्यही सुरू आहे. कृष्णाईच्या कला क्षेत्रातील कामगिरीसाठी 'लोकसत्ता'च्या तरुण तेजांकित २०२२ या पुरस्काराने तिला सन्मानितही करण्यात आलं आहे. गावकऱ्यांचा विरोध पत्करून लोककलांच्या संवर्धनासाठी धडपडणाऱ्या कृष्णाईच्या प्रवासाविषयी जाणून घेऊ.

Recommended