दोनशेहून अधिक महिलांना जटामुक्त करणाऱ्या नंदिनी जाधव | गोष्ट असामान्यांची भाग ५८ | Nandini Jadhav
  • 7 months ago
नंदिनी जाधव या अंधश्रद्धा निर्मूलन समितीच्या राज्य कार्यकारणी सदस्या आहेत. महाराष्ट्रात 'जटा' निर्मूलनासाठी त्यांचं प्रभावी काम सुरू आहे. पुण्यात व्यावसायिक ब्युटी पार्लर चालवणाऱ्या नंदिनी जाधव या २०११ साली अंनिसशी जोडल्या गेल्या. डॅा. नरेंद्र दाभोळकर यांचं काम त्यांना कायमच प्रेरीत करत आलं. मात्र, त्यांच्या हत्येमुळे नंदिनी काहीशा अस्वस्थ झाल्या होत्या. समाजासाठी आपणही काहीतरी करावं या भावनेनं त्यांनी आपला ब्युटी पार्लरचा व्यावसाय बंद केला आणि कायमचं सामाजिक कार्यासाठी स्वतः ला वाहून घेतलं. गेल्या ११ वर्षांत त्यांनी महाराष्ट्रातील खेडोपाड्यांत जाऊन दोनशेहून अधिक महिलांना जटमुक्त केलं आहे. त्याचबरोबर जात पंचायत, बुवाबाजीविरोधातही नंदिनी यांचं काम सुरू आहे.
Recommended