'सिंहासन’ हा ७०च्या दशकातील गाजलेला मराठी चित्रपट. प्रसिद्ध दिग्दर्शक जब्बार पटेल यांनी या चित्रपटाचं दिग्दर्शन केलं होतं. १९७९ साली प्रदर्शित झालेल्या या चित्रपटाला ४४ वर्ष पू्र्ण झाली आहेत. यानिमित्ताने मुंबईत एका कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलं होतं. या कार्यक्रमाला दिग्दर्शक जब्बार पटेल, अभिनेते नाना पाटेकर, मोहन आगाशे, खासदार सुप्रिया सुळे व राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी उपस्थिती दर्शविली. या कार्यक्रमात सिंहासन चित्रपटाचे अनेक किस्से शेअर करण्यात आले #sihasan #sharadpawar #jabbarpatel #nanapatekar #supriyasulefc