Khadse on Bapat: 'ज्या ठिकाणी भाजपाचं अस्तित्व नव्हतं...' बापटांच्या निधनावर खडसेंच्या भावना

  • last year
भाजपाचे पुण्यातील खासदार गिरीश बापट यांचं निधन झालं आहे. ते ७२ वर्षांचे होते. प्रकृती अस्वास्थ्यामुळे गेल्या दीड वर्षांपासून त्यांच्यावर पुण्यातील रुग्णालयात उपचार सुरू होते. मात्र, त्यांची प्राणज्योत मालवल्याची माहिती समोर आली आहे. गिरीश बापट यांच्यावर संध्याकाळी सात वाजता वैकुंठ स्मशानभूमीत अंत्यसंस्कार केले जाणार आहे. त्यांच्या निधनावर एकनाथ खडसे यांनी प्रतिक्रिया दिली, 'माझा अनेक वर्षांपासूनचा सहकारी काळाने हिरावून नेला' अशा भावना खडसे यांनी व्यक्त केल्या.

Recommended