Ujjwal Nikam on SC Hearing: सत्तासंघर्षाच्या सुनावणीवर उज्वल निकमांची प्रतिक्रिया | Shinde-Thackeray
  • last year
Ujjwal Nikam on SC Hearing: सत्तासंघर्षाच्या सुनावणीवर उज्वल निकमांची प्रतिक्रिया | Shinde-Thackeray

शिंदे आणि ठाकरे सत्तासंघर्षाच्या सुनावणीबाबत विशेष सरकारी वकील उज्वल निकम यांनी न्यायलयात काय झाले ते सांगितले. 'सत्तासंघर्षाच्या सुनावणीमध्ये शिंदे गटाचे वकील हरीश साळवे यांनी न्यायालयामध्ये युक्तीवाद करताना न्यायालयाने नैतिकता-अनैतिकता राजकारणात पाहू नये, कारण नैतिकता अनैतिकता जर बघायला लागलो. तर न्यायालयाला स्वायत्त संस्थांमध्ये अप्रत्यक्ष हस्तक्षेप करावा लागतो आणि लोकशाहीच्या दृष्टीने योग्य होणार नाही. हा पहिला युक्तिवाद होता. तसेच न्यायालयाने जर-तर बघू नये असा दुसरा युक्तिवाद हरीश साळवे यांनी केला आहे' हे उज्वल निकम यांनी स्पष्ट केले आहे. त्याचबरोबर उद्धव ठाकरे गटाच्या वकिलांनी आतापर्यंतच्या युक्तिवादाचा सारांश हा जोडपत्राच्या माध्यमातून न्यायालयासमोर सादर केला असून त्याच पाच मुद्द्यांच्या आधारे न्यायालयाने निर्णय द्यावा' अशी मागणीही ठाकरे गटाने केल्याचे निकम यांनी सांगितले.
Recommended