"आंदोलन करण्याची वेळ आमच्यावर का आली?"; बच्चू कडूंचा संतप्त सवाल | Bacchu Kadu
  • last year
प्रहार संघटनेचे अध्यक्ष आणि आमदार बच्चू कडू यांना नाशिक जिल्हा आणि सत्र न्यायालयाने दोन वर्षांची शिक्षा सुनावली आहे. २०१७ साली दिव्यांगांसाठी केलेल्या एका आंदोलनादरम्यान सरकारी कामात अडथळा आणल्या प्रकरणी आणि एका सरकारी अधिकाऱ्याला अपमानित केल्याप्रकरणी ही शिक्षा सुनावण्यात आली आहे. तत्कालीन नाशिक महापालिकेचे आयुक्त अभिषेक कृष्णा यांनी बच्चू कडू यांच्याविरोधात गुन्हा दाखल केला होता. न्यायालयाने या संपूर्ण प्रकरणावर शिक्षा सुनावल्यानंतर बच्चू कडूंनी आपली प्रतिक्रिया दिली आहे.
Recommended