Kasba Byelection: कसब्यात मतदानाला सुरूवात; मतदाराची भावना काय?
  • last year
Kasba Byelection: कसब्यात मतदानाला सुरूवात; मतदाराची भावना काय?

कसबा विधानसभा मतदारसंघात भाजपकडून हेमंत रासने, तर महाविकास आघाडीकडून रवींद्र धंगेकर यांच्यासह १७ उमेदवार निवडणुकीच्या रिंगणात आहेत. या निवडणुकीत अनेक आरोप प्रत्यारोप पाहण्यास मिळाले. तर ही निवडणूक सर्वच राजकीय पक्षांनी प्रतिष्ठेची केली असताना आज सकाळी सात वाजण्याच्या सुमारास मतदान प्रक्रियेला सुरुवात झाली. यावेळी मतदानाच्या ठिकाणी आलेल्या मतदार नेमावती नवलखा यांनी आपल्या पसंतीच्या नेतृत्वाविषयी भावना व्यक्त केली आहे. मतदारांना नेमकं काय अपेक्षित आहे हे त्यांनी सांगितलं.
Recommended