'सरकारला कुठलेही खासगीकरण करायचे नाही'; Devendra Fadnavis यांचे स्पष्टीकरण आणि संप मागे
  • last year
महावितरण, महाजनको आणि महापारेषणमधील खासगीकरणाला विरोध करत मध्यरात्रीपासून कर्मचारी संपावर गेले होते. ३२ संघटनांच्या दीड लाख कर्मचाऱ्यांनी एकत्र येऊन तीन दिवसांचा संप पुकारला होता. आज उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी या संघटनांशी संवाद साधण्यासाठी बैठक बोलावली होती. तीनही सरकारी कंपन्यांतील अधिकृत कर्मचारी आणि कंत्राटी कर्मचाऱ्यांचे प्रतिनिधी या बैठकीला उपस्थित होते. फडणवीस यांच्या स्पष्टीकरणानंतर महावितरणच्या कर्मचाऱ्यांनी संप मागे घेतला.
Recommended