Skip to playerSkip to main contentSkip to footer
  • 12/30/2022
बेळगावसह सीमा भाग हा केंद्रशासित प्रदेश करण्याची मागणी का होत आहे? तेथील सरकार, कानडी संघटना मराठी माणसांवर अन्याय करत आहेत. तिथल्या सरकारने मराठी माणसांना संरक्षण द्यावे. सर्वोच्च न्यायालयाने सीमाप्रश्नी 'जैसे थे'चे आदेश दिलेले आहेत. मात्र हा आदेश पाळला जात नाही. म्हणूनच हा भाग केंद्रशासित करावा अशी मागणी केली जात आहे. कर्नाटकने मराठी भाषा तसेच मराठी माणसाला संरक्षण द्यावे. त्यानंतर आम्ही आमची मागणी मागे घेऊ. याउलट मुंबई देशाची आर्थिक राजधानी असली तर महाराष्ट्राची राजधानी आहे. मुंबईत सर्व प्रांतातील लोक आनंदाने राहतात. येथे कानडी बांधवही राहतात. मात्र आम्हाला त्यांची अडचण नाही. मुंबई केंद्रशासित करा अशी मागणी करा म्हणणारे मुर्ख लोक आहेत, असे मत संजय राऊत यांनी व्यक्त केले.

Category

🗞
News

Recommended