Ganesh Visarjan | शिवसेना नेते आणि शिंदे गटाचे बंडखोर आमदार जेव्हा समोरासमोर येतात तेव्हा.. | Sakal

  • 2 years ago
Aurangabad Ganesh Visarjan 2022 Live : औरंगाबादमध्ये सार्वजनिक गणेश विसर्जन मिरवणुकीत शिवसेना विरुद्ध भाजपा असं मानापमान नाट्य पाहायला मिळालं. मागील 28 वर्षात पहिल्यांदाच शिवसेना नेते चंद्रकांत खैरे यांच्याविना संस्थान गणपतीची सार्वजनिक आरती करण्यात आली. यावेळी आरतीला भाजपाचे नेते केंद्रीय अर्थ राज्यमंत्री भागवत कराड, भाजपाचे सहकार मंत्री अतुल सावे आणि इतर भाजपाचे नेते उपस्थित होते. काही वेळानंतर विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते अंबादास दानवे आले, त्यानंतर चंद्रकांत खैरे आले आणि मग मानापमान नाट्याला सुरुवात झाली. व्यासपीठावर भाजपाचे नेते बसलेले होते. खरंतर वर्षानुवर्षाची परंपरा आहे की सर्व नेते एकत्र येऊन संस्थान गणपतीचा रथ ओढतात आणि सार्वजनिक गणेश विसर्जन मिरवणुकीला सुरुवात होते. यावेळी भाजपाच्या नेत्याची वाट न पाहता अंबादास दानवे आणि चंद्रकांत खैरे यांनी संस्थांचा रथ ओढायला सुरुवात केली. त्यामुळे सेना भाजपा मानापमान नाट्य पहायला मिळालं.

Recommended