Dilip Lande on Amol Mitkari Vs Mahesh Shinde : ज्यांचे कपडे उतरले जात होते, त्यांनी धक्काबुक्की सुरु केली
  • 2 years ago
Amol Mitkari vs Mahesh Shinde : विधिमंडळाच्या पायऱ्यांवर आज अभूतपूर्व असा गोंधळ घडला आहे. सत्ताधारी आणि विरोधक आमदारांमध्ये यावेळी जोरदार राडा झाल्याचं चित्र पाहायला मिळालं. यावेळी हाऊस सुरु होण्याआधी सत्ताधारी-विरोधक आमनेसामने आले. यावेळी आमदार एकमेकांच्या अंगावर धावले. यावेळी शिंदे गटातील महेश शिंदे आणि राष्ट्रवादीचे आमदार अमोल मिटकरी भिडल्याचं चित्र पाहायला मिळालं. त्यानंतर आता आम्हाला आई-बहिणीवरुन शिवीगाळ झाली असे आरोप मिटकरींनी केले आहेत.
Recommended