मधमाशी चावली आणि खडसेंची गुडघेदुखी पळाली; स्वस्तात मस्त रामबाण उपाय

  • 2 years ago
काही दिवसांपूर्वी चालण्यासाठी व्हिलचेअरचा आधार घेणारे खडसे आता पुन्हा एकदा आधीसारखं चालू आणि फिरू लागलेत. गुडघेदुखीने देशभरातले दवाखाने फिरुन आल्यानंतर त्यांना औरंगाबादमध्ये असा रामबाण उपाय सापडला, ज्याचा परिणाम तुमच्या समोर आहे. मधमाशीच्या थेरपीने एकनाथ खडसेंची गुडघेदुखी आणि पाठदुखी कायमची दूर झालीय. औरंगाबादचे डॉ. नांदेडकर हे खडसेंवर उपचार करताय. या उपचारपद्धतीने अनेकांना रक्तदाब, शुगर, थायरॉईडच्या त्रासातून बरं केल्याचा दावा डॉ. नांदेडकर यांनी दावा केलाय. गुडघेदुखीचा त्रास ज्याला होतो, त्यालाच त्याच्या वेदना समजू शकतात. विशेष म्हणजे गुडघेदुखीने एकदा डोकं वर काढलं की सतत गोळ्या खाणं सुरुच ठेवावं लागतं. पण मधमाशी चाव्याची थेरेपी यावर रामबाण उपाय ठरत असल्याचं खडसेंच्या बाबतीत दिसून येतंय. अपेक फ्लोरा नावाच्या मधमाशीचा या उपचार पद्धतीमध्ये वापर केला जातो. या मधमाशीचा दंश रुग्णाच्या कंबरेच्या खाली एका विशिष्ट भागी दिला जातो. दंश झाल्यानंतर मधमाशीचं विष हे रुग्णाच्या अंगात भिनतं. ही प्रक्रिया साधारणपणे 30 सेकंदात पूर्ण होते. हे विष संतुलित स्वरुपाचं असतं ज्याचा रुग्णाला फायदा होतो. मधमाशी दंशाच्या उपचार पद्धतीची दुसरी थेरेपी एकनाथ खडसे यांच्यावर सुरू आहे. खडसेंनी त्यांना होणाऱ्या त्रासातून मुक्ती मिळवण्यासाठी जोधपूर, केरळच्या वाऱ्या केल्या होत्या. मुंबईमध्येही त्यांनी उपचार करुन पाहिले होते. मात्र, त्यांचा त्रास कमी झाला नव्हता. आता मधमाशी चाव्याची थेरेपी केल्याने आपल्याला 70 ते 80 टक्के फायदा झालाय. आपण आता कोणाच्याही आधाराशिवाय चालू शकतो, लहान पायऱ्याही चढू शकतो, एवढच नाहीतर फुटबॉल सुध्दा खेळु शकतो असं खडसे सांगताय. प्रत्येकाच्या घरातील वृद्धांना गुडघेदुखीच्या त्रासाचा सामना करावा लागतो आणि यावर होणारा खर्चही मोठा असतो. खडसेंनीही देशात अनेक ठिकाणी जात खर्च केला, पण काहीही गुण आला नाही. पण औरंगाबादेत अत्यंत कमी किंमतीत उपचार त्यांना मिळाले आणि गुणही आलाय. मधमाशीला अनेक जण घाबरत असतील, पण हीच एका विशिष्ट जातीची मधमाशी गुडघेदुखीच्या वेदनेपासून मुक्ती देणारी ठरतीय.

Recommended