Agriculture News | जीडीपीच्या तुलनेत कृषी खर्चाचं प्रमाण किती ? | Sakal |

  • 2 years ago
Agriculture News | जीडीपीच्या तुलनेत कृषी खर्चाचं प्रमाण किती ? | Sakal |


पदोपदी शेतीचा विकास अन शेतकऱ्यांच्या कल्याणाची भाषा बोलल्या जाणाऱ्या भारतात सकल राष्ट्रीय उत्पादनाच्या (GDP) तुलनेत शेतीसाठी केला जाणारा खर्च जगात सर्वात कमी भरतो. आधुनिक तंत्रज्ञानाचा अंगीकार, शेतकऱ्यांच्या उत्पन्न दुप्पट करण्याची भाषा बोलल्या जात असताना प्रत्यक्षात गेल्या दशकात केंद्र सरकारच्या कृषी क्षेत्रासाठीच्या खर्चात लक्षणीय कपात झाल्याचं समोर आलं आहे. २०११-२०१२ ते २०१८-२०१९ दरम्यानच्या केंद्रीय आणि राज्यांच्या अर्थसंकल्पातील तरतुदींचा अभ्यास करून एफएएसच्या (FAS) संशोधकांनी हे निरीक्षण नोंदवलं आहे.
भारतातील #कृषी क्षेत्राचा आजवरील विकास हा सरकारी खजिन्यातून उपलब्ध करून दिलेल्या निधीवरच अवलंबून असल्याचं या अभ्यासकांनी म्हटलंय.


#AgricultureNews #Marathinews #Marathilivemews #Maharashtranews

Recommended