13 एकर ऊसासह चार म्हशी, दोनशे कोंबड्या घरासह जळून खाक

  • 2 years ago
महावितरणच्या गलथान कारभाराचा फटका बीड जिल्ह्यातील शेतकऱ्याला बसला आहे. वडवणी तालुक्यातील बावी ताडा परिसरातील ही आग लागल्याची घटना घडली आहे. ऊसाच्या शेतात 33 केव्हीची विद्युत तार तुटल्याने आग लागल्याची घटना घडली. शेतातील 13 एकर ऊस, चार म्हशी, 200 कोंबड्या आणि शेतकऱ्यांचं घर जळून खाक झालं आहे. यात शेतकरी दामू राठोड, शेषेराव राठोड आणि प्रल्हाद आडे यांचं मोठं नुकसान झाले आहे. महावितरणच्या गलथान कारभाराचा कळस पुन्हा एकदा जिल्ह्यात पाहायला मिळाला.

Recommended