Special Repor | झरा...जगण्याचा आधार | Sakal |

  • 2 years ago
Special Report | झरा...जगण्याचा आधार | Sakal |

बसुदेवाच्या मंदिराची स्‍थापना १९३७ सालातील...या मंदिराच्या गाभार्‍यातूनच पाण्याचा एक नितळ झरा वाहतो...मंदिराबाहेरही एक झरा आहे.
...बसुदेवाच्या झर्‍याच्या पाण्याला दहा, वीस वर्षांचा नाहीतर दोन, चार पिढ्यांचा इतिहास आहे. पठारावरनं खोबणीत आलेल्या धनगरवाड्यातील लोक बसुदेव मंदिराच्या झर्‍यातलं पाणी कळशीनं न्यायचे . आता झर्‍याच पाणी थेट घरात आलं आहे. उन्‍हाळ्यात मात्र पाणी कमी पडत असल्याने जनावरांची हाल होतायत.पाण्याचा कायतरी बंदोबस्‍त करायला पाहिजे...असे पासष्‍ट वर्षांच्या नकलुबाई हुंबे सांगत होत्या. हुंबे या मिणचे बुद्रुक येथील बसुदेवाच्या धनगरवाड्यावर (ता.भुदरगड) राहतात..पिढ्यानपिढ्या गावाला झर्‍याच्या पाण्यानंच तारलंय...नुसत माणसांनाच नाही, जनावरं, गुरंढोरांनाही या पाण्याचाच आधार आहे...नउ महिने पाण्याचा सुकाळ असलेल्या मिणचे बुद्रुक व त्याच्या वाड्यावस्‍त्यांना ऐन उन्‍हाळ्यात मात्र टंचाईला तोंड द्यावे लागते...ही कहाणी प्रातिनिधीक असली तरी जिल्‍ह्यातील ५०० पेक्षा अधिक गावं,वाड्या वस्‍त्यांना झर्‍याच्या पाण्याचाच आधार आहे...या झर्‍याच्या पाण्याचीच ही कहाणी....

बातमीदार - सदानंद पाटील
व्हिडिओ - बी. डी. चेचर

#Specialreport #Marathinews #maharashtranews