Dattatray Bharne l काय अहो मंत्रिसाहेब, मुख्यमंत्र्यांचंच नाव विसरलात? l Sakal

  • 2 years ago
Dattatray Bharne l काय अहो मंत्रिसाहेब, मुख्यमंत्र्यांचंच नाव विसरलात? l Sakal

राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते आणि सार्वजनिक बांधकाम राज्यमंत्री दत्तात्रय भरणे यांना मुख्यमंत्र्यांच्या नावाचा विसर पडल्याचं पाहायला मिळालं. महत्वाची बाब म्हणजे भर सभेत भरणेंनी विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांचाच मुख्यमंत्री म्हणून उल्लेख केला. जेव्हा स्टेजवर उपस्थित असलेल्यांनी ही चूक मंत्र्यांच्या लक्षात आणून दिली त्यानंतर त्यांनी आपली चूक सुधारली. इंदापूर शहरात पीपल्स रिपब्लिकन पक्षाचे महाराष्ट्र राज्याचे युवक अध्यक्ष संजय सोनवणे यांचा वाढदिवस साजरा करण्यात आला. यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून राज्यमंत्री दत्तात्रय भरणे उपस्थित होते.

#DattatrayBharne #MLABharne #UddhavThackeray #bjp #ThackeraySarkar #Elections2022 #ncp #ShivSena #DevendraFadnavis #MaharashtraPolitics #rajkaran #MarathiNews #MaharashtraNews #esakal #SakalMediaGroup

Recommended