Republic Day 2022: महाराष्ट्राच्या चित्ररथाची कविता गायक सुदेश भोसले यांच्या आवाजात
  • 2 years ago
आजच्या प्रजासत्ताक दिनी (Republic Day) दिल्लीच्या राजपथावर विविध राज्यांचे चित्ररथ पहायला मिळतात. यंदाही महाराष्ट्राचे वैभव पुन्हा एकदा दिल्लीतील राजपथावर पहायला मिळाले आहे. यावेळी महाराष्ट्राची जैवविविधता (Biodiversity of Maharashtra) ही यंदाच्या चित्ररथाची वैशिष्ट्य आहेत. या चित्ररथावर महाराष्ट्र असे मध्यभागी लिहिण्यात आले होते. तसेच त्यावर भव्य ब्ल्यू मॉरमॉन फुलपाखराची 8 फूट उंचीची देखणी प्रतिकृती दाखवण्यात आली होती.
तर, या चित्ररथाचे आणखी एक वैशिष्ट्य म्हणजे प्रसिद्ध गायक सुदेश भोसले ( Singer Sudesh Bhosle) यांच्या आवाजातील चित्ररथाची कविता आहे. सुरुवातीला ही कविता हिंदीत रेकॉर्ड करण्यात आली होती त्यानंतर, सुदेश भोसले यांनी हिंदी आणि नंतर मराठीतही ती रेकॉर्ड केली आणि ती दिल्लीला पाठवली. तेव्हा महाराष्ट्राच्या चित्ररथासाठी मराठीतील कविताच योग्य असल्याचे लक्षात घेऊन मराठी कवितेला परवानगी देण्यात आली आहे.
#republicday #biodiversityofmaharashtra #sudeshbhosale #maharashtra #maharashtrarathonrajpath #republicday2022 #republicdaylive #newdelhi
Recommended