बळीराजा आनंदला! १५ वर्षात प्रथमच सहस्त्रकुंड इथला धबधबा आजही प्रवाहित

  • 2 years ago
यंदा मराठवाडयासह विदर्भावर वरुणराजा अगदी वर्षभर मेहेरबान होता. पावसाळ्यात झालेली अतिवृष्टी आणि त्यानंतर अवकाळी पावसामुळे पैनगंगा नदी अद्यापही प्रवाहित आहे. त्यामुळे पैनगंगा नदीवरचा किनवट तालुक्यातील सहस्त्रकुंड इथला धबधबा आजही प्रवाहित असल्याचे दिसतयं. या धबधब्याच्या तिन्ही प्रमुख धारांतून आताही पाणी प्रवाहित होतंय. एरव्ही दरवर्षी नोव्हेंबरमध्ये पैनगंगा नदीचा प्रवाह आटत असतो त्यामुळे हा धबधबा कोरडा पडलेला दिसतो. मात्र यंदा मुबलक पावसामुळे अगदी जानेवारीच्या शेवटी देखील सहस्रकुंड इथला धबधबा प्रवाहित आहे.

Recommended